विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

सामना ऑनलाईन । मुंबई

पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात मोठी उष्णतेची लाट येईल असा अंदाज हिंदुस्थानी हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील तीन दिवसांत विदर्भ मराठवाड्यात तापमान वाढणार आहे. अनेक ठिकाणी तामपान हे 46 अंशाच्या घरात जाणार आहे. दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. आजही विदर्भात सुर्यदेव कोपला आहे. चंद्रपुरमध्ये  सध्या 44 अंश तापमान आहे.