राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात दिनांक 24 आणि 25 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे डेक्कन येथे भिडे पूल पाण्याखाली गेला असून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिला तर त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग 12,958 क्युसेक्सने वाढवून दुपारी चार वाजता 19118 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुठा कालवा पाठबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी दिली.
View this post on Instagram