निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी टोमॅटो ज्यूस रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

वातावरण बदल आणि वेगवेगळे आजार यामुळे रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असलेली चांगले. यासाठी आहारतज्ज्ञ विविध फळं, पालेभाज्या, कडधान्य यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यातीलच एक फळभाजी म्हणजे टोमॅटो.

भाज्यांची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे आणि सलाडमध्येही सामावून जाणारे टोमॅटो पौष्टिक तर असतेच शिवाय रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे आणि निरोगा त्वचेसाठीही गुणकारी असते. कोरोना संक्रमणाच्या या काळामध्ये रोगप्रतिकारक क्षमता किती गरजेची आहे हे तुम्ही ऐकून असालच. त्यामुळे टोमॅटोचा नियमित वापर करा आणि याचे ज्यूसही घ्या. टोमॅटोचे ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच प्रतिकारक क्षमताही मजबूत होते.

टोमॅटोमधील पोषणमुल्य

– टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडेंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
– तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बिटा कॅरोटीनही याच मोठ्या प्रमाणात आढळते.
– जैविक सोडीयम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्निशियम आणि सल्फरचा चांगला स्त्रोत

कोरोनापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले सोपे उपाय, प्रतिकारक क्षमताही होईल मजबूत

असे बनवा टोमॅटो ज्यूस

साहित्य – 2 टोमॅटो, 1 ग्लास पाणी आणि चवीसाठी मिठ
कृती – टोमॅटो व्यवस्थित धुवून घ्या आणि बारीक तुकडे करा. यानंतर ज्यूसरमध्ये टाकून यात पाणी आणि मिठ एकत्र करा. यानंतर ज्यूस ग्लासमध्ये काढून घ्या आणि प्या.

फायदे

– कर्करोगाचा धोका कमी होतो
– हार्ट पेशंटसाठी फायदेशीर
– वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
– स्नायू मजबूत होतात
– टोमॅटो ज्यूसमध्ये काळे मिरे टाकून नियमित सेवन केल्यास पोटाच्या समस्या कमी होतात
– पचनक्रिया मजबूत होते
– रक्त शुद्ध होण्यास मदत होते
– त्वचेच्या समस्या कमी होण्यात फायदेशीर
– टोमॅटोतील ग्लूटाथियोनमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते

Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर

आपली प्रतिक्रिया द्या