कायदा जाणून घ्या!

> महिलांच्या कल्याणासाठी आता बरेच कायदे आहेत. त्यामुळे कुठल्याही महिलेच्या मान-सन्मानाला धक्का पोहोचेल असे कृत्य कुणी करत असेल तर ती महिला त्या व्यक्तीविरुद्ध कलम ३५४ अन्वये ऍक्शन घेऊ शकते.

> कुणी व्यक्ती धमक्या देत असेल, इजा करण्याचा प्रयत्न करत असेल, तिच्या मनाविरुद्ध काम करवून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आयपीसीच्या कलम ५०३ अंतर्गत त्या व्यक्तीवर केस ठोकता येईल.

> महिलांशी केला जाणारा सवाल जवाब ते कोठेही, खासगी ठिकाणावरूनही रेकॉर्ड करून देऊ शकतात. या जबाबाच्या प्रसंगी तेथे एक पोलीस आणि एक महिला कॉन्स्टेबल हजर असणे गरजेचे आहे.

> महिलांसाठी आता ‘झीरो एफआयआर’ हा कायदा आहे. महिला आता कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करू शकतात. घटना किंवा पीडित महिला त्या पोलीस ठाण्याअंतर्गत भागातील नसली तरीही तेथील पोलीस अधिकाऱयांनी ‘एफआयआर’ लिहून घेतलीच पाहिजे.