इम्पीरियल ब्लूचे नॉर्थईस्ट युनायटेड क्लबशी सहकार्य

सिग्रामच्या इम्पीरियल ब्लू या उद्योगातील सर्वात प्रतिष्ठत ब्रॅण्डने सलग दुसऱया वर्षात नॉर्थईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब (एनईयूएफसी) सोबतचा विशेष सहयोग कायम ठेवला आहे. गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये इम्पीरियल ब्लू व एनईयूएफसी खेळाडूंनी या सहयोगाच्या यशाला साजरे केले आणि फुटबॉल खेळाप्रति नॉर्थईस्टच्या आवडीला अग्र पसंती दिली. देशभरातील तरुणांच्या आवडीला सिग्रामच्या इम्पीरियल ब्लूचा सतत पाठिंबा व एनईयूएफसीचे खेळामधील यश या दोन्ही ब्रॅण्ड्सना युवकांसोबतचे संबंध प्रबळ करण्याची संधी देतात,अशी माहिती पर्नोद रिकार्ड इंडियाच्या विपणनचे महाव्यवस्थापक इश्विंदर सिंग यांनी दिली.