डाळींवरील निर्यातबंदी हटविली

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशात डाळींचे विक्रमी उत्पादन झाल्याने आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व प्रकारच्या डाळींवरील निर्यातबंदी हाटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी तूर, मूग डाळींवरील निर्यातीचे निर्बंध हटविले, मात्र सर्व डाळींवरील निर्बंध उठविण्याची मागणी देशभरातील शेतकऱ्यांनी केली होती. अखेर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व डाळींवरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून १.८ दशलक्ष टन डाळींचा बफर स्टॉक केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या