गुळ-कडुनिंब आणि गुढीपाडवा

dr-namrata-bharambe>> डॉ. नम्रता महाजन-भारंबे

गुढीपाडवा हा हिंदुंचा मुख्य सण तसेच मराठी नववर्ष. प्रत्येक सण व उत्सवाला भारतात सांस्कृतिक व धार्मिक प्रतिष्ठान तर आहेच पण प्रत्येक सण हा त्या-त्या त्रृतुमानांनुसार हे देखील दर्शवित असतो. गुढीपाडवा म्हणजेच चैत्र- प्रतिपदा हा दिवस आता ‘Neem Day’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वतोपरी उपयुक्त असणाऱ्या कडुनिंबाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले जाते.

गुढीपाडव्याचा दिवशी पहाटे गुढी उभारली जाते. घरांना आंब्याची पाने, झेंडूची फुले यांचे तोरण लावले जाते व सोबतच निंबाचा पाला देखील लावला जातो. निंबाच्या पाल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष महत्तव आहे. घरातील मोठी माणसे सकाळी-सकाळी निंबाची कोवळी पाने चघळायला सांगतात.

१) गूळ –jaggery

गूळ हा उसाचा रसापासून तयार होणाऱ्या अनेक व्यंजनांपैकी एक पदार्थ आहे. साखरेपेक्षा गुळामध्ये खनिजे आणि अॅटीऑक्सिण्टस चे प्रमाण जास्त असते. शरीरातील लोहाची कमतरता गुळामुळे भरून निघते. गुळ हा उत्तम पाचक आहे. म्हणूनच पूर्वी जेवणानंतर गुळ हा बद्धकोष्ठ देखील दूर करतो. गुळ घेताना तो सेंद्रिय असल्याची खात्री करून घ्यावी. (टीप- सेंद्रिय गुळ बनवताना त्यामध्ये भेंडीचा रस वापरतात.) उन्हाळ्यात उष्माघातापासुन वाचण्यासाठी बाहेरून आल्यावर गुळ व त्यावर पाणी प्यावे.

neem-leaves२) कडुनिंब-

कडुनिंब हे अनंतप्रकारे आपल्यासाठी उपयुक्त आहे. कडुनिंब हे उत्तम कृमीनाशक आहे. कडुनिंब त्वचेच्या अनेक विकारांवर उत्कृष्टरित्या काम करते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कडुनिंब मधुमेही व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

कडुनिंबाचे तेल किंवा पाल्याचा रस सेंद्रिय शेतीपद्धतीमध्ये किडनाशक म्हणून वापरतात. तसेच निंबाचा पाला धान्य साठवणूक करताना धान्यामध्ये टाकतात.

आपण सर्वजण गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य असल्यास एक कडुनिंबाचे झाड लावू या. आणि जर ते शक्य नसल्यास किमान पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टी टाळण्याचा मानस करू या.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!