माझं कुंकू

390

सामना ऑनलाईन । मुंबई

कुंकू… दोन भुवयांच्या मध्यभागी लावले जाणारे सौभाग्यचिन्ह… देवपूजेतील मांगलिक पदार्थ… हळदीच्या चूर्णापासून कुंकू तयार करतात. महिलांच्या शृंगारापैकी कुंकू हाही एक शृंगारच आहे. पारंपरिक वेशभूषा केल्यावर कपाळावर लावले जाणारे कुंकू स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते.

कपाळावर केवळ कुंकू लावल्याने सुंदरता वाढण्यास मदत होतेच, पण स्वास्थ्य लाभदेखील होतो. कुंकू लावताना दोन भुवयांच्या मध्ये हलकासा दाब पडतो. त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो. स्नायूंचा ताण हलका होऊन चेहरा उजळतो. वातावरणातील सकारात्मक ऊर्जा स्त्रीकडे आकृष्ट होते.

कुंकू कसे लावावे?
आंघोळ झाल्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने (करंगळीच्या शेजारील बोट) कपाळावर कुंकू लावावे. कपाळाला कुंकू चिकटण्यासाठी मेणाचा वापर करावा.

एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला कुंकू लावण्यामागील शास्त्र
दुसऱया स्त्रीला किंवा पुरुषाला कुंकू लावताना मध्यमेचा वापर करावा. कुंकवामध्ये आध्यात्मिक शक्ती असते. दुसऱ्यांना कुंकू लावणे हे पूजा करणे, दुसऱ्यांना सन्मानित करण्याचे कर्म आहे. त्यामुळे कुंकू लावणाऱया स्त्रीच्या बोटाला कुंकू लागल्याने कुंकवामधील चैतन्य दुसऱ्या स्त्रीलाही मिळते.

भांगात कुंकू लावल्याने होणारे लाभ
स्त्रीयांचे मस्तक पुरुषांच्या मस्तकाच्या तुलनेत मऊ आणि संवेदनशील असते. केसातील भांगाचा भाग हा मध्यभागी असल्याने तो सर्वाधिक संवेदनशील असतो. सुवासिनी स्त्रीयांच्या भांगातील कुंकू किंवा सिंदूर पाहून हिंदु पुरुषांना शत्रूशी लढण्यासाठी चैतन्य मिळून त्यांची क्षात्रवृत्ती अन् उत्साह वाढत असे. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रीयांनी कुंकू किंवा सिंदूर यांचा कपाळावर किंवा भांगात लावण्यास वापर करणे, हे मानसिक, आध्यात्मिक या कारणांसाठी योग्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या