‘मायक्रोग्रीन’ जेवणात ठरेल खास, तब्येतही राहिल झकास

dr-namrata-bharambe>>डॉ. नम्रता महाजन-भारंबे

 

सध्या जगभरात ‘मायक्रोग्रीन’ नावाचे वादळ पसरत आहे. मॉल्समध्ये एका कोपऱ्यात तुम्हाला मायक्रोग्रीन कॉर्नर बघायला मिळू शकतो. तसेच एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे मायक्रोग्रीन ‘chef’s secret ‘ रेसिपीमध्ये आणि वेगवेगळ्या डिशेसला aesthetic look देण्यासाठी आवर्जून वापरले जातात. बहुतांश आहारतज्ञ मंडळी मायक्रोग्रीन्सच्या प्रेमात पडण्याचे कारण म्हणजे त्यात असणाऱ्या पोषक तत्वांचे प्रमाण खूप जास्त आहे.

पालेभाजी किंवा सॅलड या वर्गवारीत मोडणारे कोणतेही बी रुजल्यानंतर सात-दहा दिवसानंतर, जेव्हा उंचीला १-२ इंच व सुरुवातीची २-३ पाने असताना काढावी. हेच नेमके ‘मायक्रोग्रीन’ असते. मायक्रोग्रीन हे अंकुरीत धान्यांपेक्षा वेगळे असतात.

मायक्रोग्रीन म्हणून तुम्ही अगदी कोणतीही पालेभाजी किंवा सॅलड भाजी घेऊ शकतात जसे बेसील, कोथिंबीर, लेट्यूस, गाजर, मुळा, बीटरुट, ब्रोकोली, कोबी, सूर्यफूल, शेपा इ.

अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की, पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या (edible dortions) तुलनेत मायक्रोग्रीन्समध्ये पोषकतत्वे ही ३०-४०% जास्त असतात. जसे Red Cabbage मायक्रोग्रीन मध्ये पूर्ण वाढ झालेल्या Red Cabbage पेक्षा ४० पट जास्त व्हिटॅमीन ‘E’ व सहापट जास्त व्हिटॅमीन ‘C’ असते. Cilantro microgreen मध्ये ३ पट जास्त बीटा कॅरोटीन व lutein असते. ब्रोक्रोली microgreen मध्ये sulforaphane हे कॅन्सर प्रतिबंध करणारे द्रव्य असते.

मायक्रोग्रीन अनेक प्रकारे वापरले जाऊ शकतात. पिझ्झा, पास्ता किंवा सॅण्डवीच मध्ये टॉपिंग्समध्ये, सॅलड्सचा फ्लेवर वाढवण्यासाठी, किंवा त्याची आकर्षकता वाढवण्यासाठी, मायक्रोग्रीनचे फ्रेश ज्यूस देखील रोजच्या आहाराचा भाग होऊ शकतो.

मायक्रोग्रीन्स हे ७-१० दिवसात तयार होत असल्यामुळे, सूर्यप्रकाश योग्य असणाऱ्या खिडकीत किंवा गॅलेरीमध्ये देखील घरच्या घरी सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे ते स्वस्त दरात तर उपलब्ध होतातच परंतु, त्यातील पोषक द्रव्ये जास्तीत जास्त उपलब्ध होतात.

चव, रंग आणि पौष्टिकता या तीनही पातळ्यांवर मायक्रोग्रीन सरस आहे. असे असले तरीही या विषयावर अजून संशोधन करण्याची व सर्वसामान्यांना ते सहज उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. [email protected]

फोन क्र. ९८२०२१५७९६

आपली प्रतिक्रिया द्या