व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त
देशभरात 1 जूनपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 69.50 रुपयांनी, कोलकात्यात 72 रुपयांनी, मुंबईत 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सलग तिसऱया महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली असून यापूर्वी एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली होती. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची पिंमत 1629 रुपये झाली आहे.
नोएडात व्यापाऱयाला 9.09 कोटींना फसवले
नोएडामध्ये शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एका बिझनेसमॅनची तब्बल 9.09 कोटी रुपयांची फसवणूक केली. गुंतवणुकीच्या नावाखाली एक अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर 13 वेळा वेगवेगळय़ा खात्यात 9 कोटी 9 लाख रुपये वळते करून घेतले. फसवणूक झाल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
एसबीएम बँकेला 88.70 लाखांचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने स्टेट बँक ऑफ मॉरिशस बँक (एसबीएम) बँकेला 88.70 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या रेग्युलेटरी नॉर्म्सचे पालन न केल्याने आरबीआयने हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने बँकेला वेगवेगळ्या दोन नोटीस जारी केल्या.
17.1 मिलियन अकाउंट हॅक
हिंदुस्थानात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जवळपास 17.1 मिलियन अकाउंट हॅक करण्यात आले, अशी माहिती ग्लोबल साइबरसिक्योरिटी पंपनी सर्फशार्कच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. अमेरिकेत 90 मिलियनहून जास्त अकाउंटला लक्ष्य करण्यात आल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
11 हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद
11 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून कुटुंबात सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला असून गॉडफ्रे फिलिप्सचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी आपल्या आईवर गंभीर आरोप केले. आईच्या सांगण्यावरून आपल्याला आईचा खासगी सुरक्षा अधिकाऱयाने धक्काबुक्की केल्याचा आरोप समीर मोदींनी केला.