जगभरातून महत्वाच्या बातम्या

फिलिपाईन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

फिलिपाईन्समधील माऊंट कानलॉन येथे ज्वालामुखीचा उद्रेक पाहायला मिळाला. पाच किलोमीटर उंच राखेचे ढग उठले आहेत. यामुळे येथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. 32 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नेग्रोस बेटावर स्पह्टानंतर राखेचा ढग आकाशात पाच किलोमीटर उंचीपर्यंत वर उठला. अजूनही ज्वालामुखीचा ढिगारा आणि गरम राख सतत बाहेर पडत आहे.

कोटामध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

कोटा येथी नीटची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थिनीने अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. नीटचा निकाल लागल्यानंतर दुसऱयाच दिवशी तिने हे पाऊल उचलले. कमी मार्क मिळाल्यामुळे तिला नैराश्याने ग्रासले होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये विद्यार्थिनी उडी मारताना दिसत आहे. ती कोटा येथील जवाहर नगर भागात आई आणि लहान भावासोबत एकत्र राहत होती.

टाईम्स स्क्वेअरवर झळकला सुप्रियांचा फोटो

बारामती मतदारसंघात एकहाती विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. बारामतीत कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी अभिनंदन करणारे बॅनर लावले आहेत. परंतु आता सातासमुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले असून परीक्षित तळोकार यांनी या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळेसोबत शरद पवार यांचाही पह्टो आहे. सोशल मीडियावर या बॅनरची चर्चा सुरू आहे.

केट मिडलटन शाही कामकाजापासून दूर

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम्स यांची पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन सध्या कर्करोगाने त्रस्त आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या लवकरच शाही कामकाज पाहणे सुरू करतील, असे बोलले गेले. परंतु, अमेरिकी मीडियाच्या माहितीनुसार, त्या आपल्या शाही कामकाजापासून दूर राहणार आहेत. याआधी त्या शाही कार्यक्रमात अग्रस्थानी असायच्या. परंतु, आजारामुळे त्या पुन्हा कामकाजात दिसणार नाहीत.

तिहार जेलमध्ये  गँगवार, 1 कैदी जखमी

तिहार जेलमध्ये पुन्हा एकदा गँगवार पाहायला मिळाला. गोगी टोळीच्या हितेशवर टिल्लू टोळीच्या गौरव आणि गुरिंदर यांनी चाकूने हल्ला केला. या गँगवॉरमध्ये जखमी झालेल्या एका पैद्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अमृतसर सुवर्ण मंदिरात खलिस्तानी घोषणाबाजी

पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40 व्या वर्धापन दिनी सुवर्ण मंदिरात शीख समुदायानी मोठी गर्दी केली. यावेळी जमावाने हातात तलवारी घेऊन ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. सुवर्ण मंदिराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

तालिबानमध्ये 63 जणांना चाबकाने फोडले

तालिबानमधील क्रूरता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. साधारण गुह्यांसाठी 14 महिलांसह 63 जणांना चाबकाने पह्डून काढण्यात आले. अनैसर्गिक लैंगिक संबंध, चोरी, स्त्राr-पुरुष संबंध असे आरोप त्यांच्यावर होते. तालिबानच्या या क्रूरतेवर संयुक्त राष्ट्रसंघाने संताप व्यक्त केला. शिक्षणावर बंदी आहे. तालिबानात साधे गाणे गायला पिंवा ऐकणे यावरही बंदी आहे. महिलांसाठी बुरखा बंधनकारक आहे.

सुनीता विल्यम्स म्हणाली चला निघू या

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी सायंकाळी अंतराळात झेप घेण्यापूर्वी मिशन कंट्रोलला संदेश पाठवला, ‘चला निघू या. पॅलिप्सो. आम्हाला अंतराळात घेऊन चला आणि परत घेऊन या’ असा संदेश दिला. सुनीता यांची आई बोनी पांडय़ा यांनी सांगितले की, अंतराळात झेप घेण्यापूर्वी सुनीता खूप उत्साही व सकारात्मक होती.

राफामध्ये हल्ले सुरूच, शाळेवरील हल्ल्यात  33 जणांचा मृत्यू

गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. याबद्दल जगभरातून टीका होत असतानाही नेत्यानाहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा व राफाला टार्गेट केले आहे. या वेळी इस्रायलच्या सैन्याने मध्य गाझा पट्टीतील नुसेरा छावणीत राहणाऱया निरपराध लोकांवर हल्ले केले. शाळेवरील हल्ल्यात कमीत कमी 33 जण मृत्युमुखी पडले. त्यामध्ये अधिक तर महिला, लहान मुले आहेत. गाझा पट्टीतील शाळांमध्ये अनेक निर्वासितांनी आसरा घेतलाय. त्यावरही आता इस्रायलकडून हल्ले होत आहेत. हमासद्वारा संचालित गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने या घटनेचा ‘भयंकर नरसंहार’ अशा शब्दांत निषेध केला आहे.

माणुसकीचा धक्का

कडक उन्हात मनाला थंडावा देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यामध्ये एक सायकल रिक्षाचालक दुपारच्या उन्हात सामानाने भरलेली रिक्षा चालवतोय. एक महिला धावत जाऊन त्याच्या रिक्षाला मागून धक्का देते. त्यामुळे रिक्षाचालकाचा भार थोडा हलका होतो. पुलावर चढण पार होईपर्यंत ती रिक्षा ढकलते.  थोडय़ा वेळाने ती रिक्षाचालकाजवळ जाऊन त्याला खाण्याचा डब्बा आणि पाण्याची बाटली देते. तसेच ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बांधायला शॉल देते. महिलेने दाखवलेल्या माणुसकीने नेटिजन्सचे मन जिंकून घेतले आहे. ‘ही आहे पापा की असली परी’ असे म्हणत नेटकऱयांनी तिचे खूप कौतुक केलेय.