विदर्भ इतिहास रचण्यासाठी सज्ज

25

सामना ऑनलाईन । इंदूर

तब्बल पाच दशके आणि २६६ रणजी सामन्यांनंतर विदर्भाचा क्रिकेट संघ रणजी क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला असून आता अजिंक्यपदावर मोहोर उमटवून इतिहास रचण्यासाठी हा संघ सज्ज झाला आहे. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया या संघाने आतापर्यंत देदीप्यमान कामगिरी करीत फायनलपर्यंत धडक मारली आहे. उद्यापासून इंदूरमध्ये सुरू होणाऱया जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर गौतम गंभीरच्या दिल्ली संघाचे आव्हान असणार आहे. दिल्लीने २००७-०८ सालानंतर रणजीचे जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे दहा वर्षांनंतर त्यांनाही मानाची स्पर्धा जिंकण्याचा ध्यास लागून राहिला असेलच.

दृष्टिक्षेपात

फैझ फझलला या मोसमात एक हजार धावा पूर्ण करण्यासाठी १५७ धावांची आवश्यकता आहे. मयांक अग्रवाल या मोसमात हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

विदर्भाकडून या मोसमात १२ शतके झळकाविली गेली आहेत. त्यापैकी आठ शतके फैझ फजल व संजय रामास्वामी या सलामीवीरांनी फटकाविली आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या