इम्रानने कश्मीर हिंदुस्थानला विकला; पत्नीचा आरोप

2892

हिंदुस्थान कश्मीरला असणारा विशेष राज्याचा दर्जा काढून घेणार हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना माहीत होते. त्यांनीच कश्मीर हिंदुस्थानला विकला आहे, असा खळबळजनक आरोप इम्रान खान यांची पूर्व पत्नी रेहम खान हीने केला आहे.

हिंदुस्थानला खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डील करण्याचा प्रयत्न इमरान खान यांनी यापूर्वीही केला होता. 5 ऑगस्ट रोजी कश्मीरसंदर्भात निर्णय घेण्यात आला. त्यावेळी एका सदस्याने फोन करून याची कल्पना दिली होती. हा प्रकार म्हणजे एक प्रकारचा सौदा असल्याचे रेहम खानने म्हटले आहे.

पुलवामा घटनेनंतरच मोदी यांच्या मनात काहीतरी वेगळे सुरू असल्याचा अंदाज आला होता तर इम्रान यांनी मोदी यांच्याशी मैत्रीचा हात का पुढे केला? असा सवाल रेहम खान हिने केला.

आपली प्रतिक्रिया द्या