शेरूमुळे इम्रान खान यांचे तिसरे लग्नही मोडणार?

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचा माजी कर्णधार व तेहरिक-ए-इंसाफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचे वैवाहीक आयुष्य कायमच चर्चेत राहिले आहे. महिनाभरापूर्वीच इम्रान यांनी त्यांची आध्यात्मिक गुरू बुशरा मनेका यांच्यासोबत निकाह केला. मात्र इम्रान यांना हे तिसरे लग्न देखील मानवले नसून त्यांची पत्नी त्यांना सोडून माहेरी परतली आहे. त्यांचे हे लग्न मोडण्याचे कारण बुशरा व इम्रान यांच्यातील मतभेद नसून इम्रान यांचा लाडका कुत्रा ‘शेरू’ आहे.

इम्रान खान यांच्या पलाटिअल येथील घरात शेरू नावाचा कुत्रा आहे. हा कुत्रा इम्रानचा अत्यंत प्रिय आहे. मात्र जेव्हा बुशरा या लग्न करून इम्रान यांच्या घरी आल्या त्यावेळी त्यांना शेरूचा काहीच त्रास जाणवत नव्हता मात्र नंतर शेरू त्यांना त्रास देऊ लागला. तो बुशरा यांच्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये अडथळा आणत होता. त्यामुळे बुशराची चिडचिड होत होती व तिने शेरूला घराबाहेर काढले. पण बुशराच्या या निर्णयामुळे इम्रान यांच्या घरातील मंडळीवर नाराज होती. त्यांनी शेरूला पुन्हा घरात आणण्याची मागणी केली होती. त्यानुसाार गेल्या आठवड्यात शेरूला पुन्हा घरी आणण्यात आले. पण यामुळे बुशरा चिडल्या व त्यांनी इम्रानचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या इम्रान यांचे घर सोडून माहेरी निघून गेल्या आहेत.

इम्रान खान यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांची आध्यात्मिक गुरू बुशरा मनेका पीर यांच्यासोबत निकाह केला होता. इम्रान यांची पूर्वी दोन लग्न झाली होती. ‘तुम्ही तिसरे लग्न केले तर पंतप्रधान व्हाल’ असा सल्ला बुशरा यांनी इम्रान यांना दिला होता. बुशरा मनेका यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न इस्लामाबादमधील वरिष्ठ कस्टम अधिकारी खवार फरीद मनेका यांच्याशी झाले होते. त्यांना पहिल्या पतीपासून ५ मुले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या