पुन्हा पुलवामाचा डाव उधळला; पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त ऑपरेशनला मोठे यश

Newa-Srinagar road in Wanpora

जम्मू आणि कश्मीरमध्ये पुलवामा पोलीस, 50 आरआर आणि सीआरपीएफ बटालियन 183, यांनी एकत्रित केलेल्या शोध मोहिमेतून दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला. यावेळी वानपोरा येथील नेवा-श्रीनगर रस्त्याच्या कडेला त्यांना एक IED पेरलेला आढळून आला. त्याचे वजन सुमारे 5 किलो होते आणि ते एका कंटेनरमध्ये एकत्र केले गेले. पोलीस आणि लष्कराच्या बॉम्ब निकामी पथकाने नियंत्रित स्फोटाद्वारे तो घटनास्थळी नष्ट केला.

दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.