बीडमध्ये भर दुपारी तहसील कार्यालयातून वाळूचा ट्रक पळवला, दोन कर्मचारी जखमी

गेवराई (सा.वा) तीन दिवसांपूर्वी वाळूने भरलेला ट्रक तहसील कार्यालयाने पकडला होता. आज दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत तो पळवून नेल्याची घटना दुपारी 12 वाजता घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून वाळू माफियांचा गुंडाराज या निमित्ताने पुन्हा दिसून आला.
तीन दिवसांपूर्वी रॉयल्टी पावती नसल्यामुळे MH11 AC 55 93 या नंबरचा ट्रक तहसील कार्यालयाने आणला होता. रॉयल्टीची पावती नसल्यामुळे 180528 रुपयांची  दंडाची नोटीससुद्धा मालकाला बजावण्यात आली होती.  दिनांक 4 मे रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात घुसून तहसीलदार यांचे ड्रायव्हर शेख व आमलेकर  कर्मचारी यांना मारहाण करत या ट्रॅकच्या चावी घेऊन  ट्रक पळून नेल्याची घटना दुपारी 12 वाजता घडली. ही सर्व घटना तहसील कार्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे वाळू माफियांचा गुंडाराज पुन्हा पहावयास मिळाला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गेवराई पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.
Reply allReplyForward
आपली प्रतिक्रिया द्या