‘बिग बॉस १२’ – सलमानसोबत ‘ही’ अभिनेत्री करणार होस्ट?

18

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची लोकांमध्ये कायमच चर्चा रंगलेली असते. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो मात्र आता बिग बॉसच्या १२व्या पर्वात सलमानसोबत आणखी एक अभिनेत्री हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. सलमानसोबत नेमकी कोणती अभिनेत्री दिसणार असा साहजिकच प्रश्न बिग बॉसच्या प्रेक्षकांना पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनेत्री कतरिना कैफ. एका हिंदी वृत्तपत्राने ‘बिग बॉस १२’ साठी कतरिनाच्या नावाची चर्चा असल्याचे वृत्त दिले आहे.

बिग बॉसचे यंदाचे पर्व हे नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे असणार आहे. यावेळचे पर्व अधिक मजेशीर करण्यासाठी यामध्ये अनेक जोड्या सहभागी करण्यात येणार आहेत. त्यामुळेच अशा पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी एक जोडी असणार आहे. सलमानसोबत कतरिनाच हा कार्यक्रम होस्ट करणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी सध्या कतरिनाच्याच नावाची चर्चा रंगली आहे. कलर्स वाहिनीच्या ट्वीटर हँडलवरून ‘बिग बॉस १२’ लवकरच सुरू होणार असून ऑडिशनला सुरुवात झाली असल्याच ट्वीट करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या