जैन मुनी तरुण सागर कडाडले, पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षा हिंदुस्थानात ‘गद्दार’ अधिक

14

सामना ऑनलाईन, सिकर

पाकिस्तानातील दहशतवाद्यांपेक्षाही हिंदुस्थानातील गद्दारांची संख्या मोठी आहे असे खडे बोल प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर यांनी सुनावले आहेत. ते राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील पिपराली येथील वैदिक आश्रमात बोलत होते. तरुण सागर यांची परखडपणे मते मांडण्याबद्दल ख्याती आहे.

देशात राहतात, देशाचे खातात आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देतात. मग अशा लोकांना गद्दार नाही तर काय म्हणायचे, असा सवाल त्यांनी यावेळी केला. जम्मू-कश्मीरमध्ये गेले काही दिवस लष्कराच्या जवानांवर सतत तुफानी दगडफेक होत आहे. त्यावर बोलताना जैन मुनींचा संतापाचा पारा चढला होता.

दहशतवादी सिंहाप्रमाणे समोरून कधीच चाल करून येत नाही. तो लांडग्याप्रमाणे मागून हल्ला करतो.
– जैन मुनी तरुण सागर, प्रवचनकार.

आपली प्रतिक्रिया द्या