काँग्रेसने 91 वेळा राष्ट्रपती राजवट लावली

1261

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटत नव्हता. तर राज्यात केंद्राकडून राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. राज्यात ही तिसर्‍यांदा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. पहिल्यांदा 1980 साली शरद पवार यांचे पुलोद सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले आणि राष्ट्रपती राजवट लावली होती. 2014 साली निवडणुकादरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.

वाजपेयी हे 1998 ते 2004 या काळात पंतप्रधान होते. सहा वर्षाच्या कार्यकाळात रालोआ सरकारने चार वेळा देशातील राज्यात राष्ट्रपती राजवट लावली होती. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात 91 वेळा बिगर काँग्रेसी सरकार हटवण्यासाठी राष्ट्रपती राजवट लादली होती.

1951 साली पहिल्यांदा नेहरू यांनी तेव्हाच्या पंजाबचे सरकार बरखास्त केरून राष्ट्रपती राजवट लावली. त्यानंतर वेगवेगळ्या राज्यात 111 वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. नेहरू यांच्या कार्यकाळात केरळमध्ये जगातील पहिले डाव्यांचे लोकनियुक्त सरकार स्थापन झाले होते. 1959 साली नेहरूंनी हे सरकार बरखास्त करून केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकार्यकार्याळात 2014 साली देशातील चार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. महाराष्ट्रापूर्वी जम्मू कश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.

उपलब्ध आकडेवारीनुसार नेहरू यांच्या 16 वर्षांच्या कारकीर्दीत 7 वेळा विविध राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. तर इंदिरा गांधी यांच्या 15 वर्षांच्या कारकीर्दीता 45 वेळा विविध राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. शास्त्री यांच्या कारकीर्दीत दोन वेळा, राजीव गांधी यांच्या काळात 5 वेळा, नरसिंह राव यांच्या काळात 11 तर मनमोहन सिंह यांच्या काळात 10 वेळा विविध राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या