थापांची होळी करत केंद्रसरकारच्या नावाने शिमगा

सामना ऑनलाईन, लातूर

केंद्र आणि राज्‍यात सत्‍तेत असणा-या भाजपा सरकारने वेळोवेळी खोटी आश्‍वासने देत जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत लातूरमधील युवकांनी खोटी आश्वासने आणि थापांची होळी पेटवली. शहरातील गांधी चौकात पेटवण्यात आलेल्या या होळीमध्ये तरुण मंडळी भाजप सरकारने जी आश्वासनं दिली होती त्यांचे फलक घेऊन जमा झाली होती. एकापाठोपाठ एक या सगळ्या तरूणांनी हातातील फलक होळीत भिरकावत आपण या सगळ्या भूलथापांची होळी केली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

या आश्वासनांची केली होळी

  • प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा करू
  • २ कोटी नोक-या उपलब्‍ध करून देऊ
  • परदेशातून काळे धन परत आणू
  • पेट्रोल-डिझेल दरवाढ रोखू न शकणं
  • शेतक-यांना ५० टक्‍के पेरणी खर्च उपलब्‍ध करून न देणं
  • हिंदुस्थानी चलन परदेशी चलनाइतके मजबूत करण्याचं आश्वासन
  • नदी जोड प्रकल्‍प सुरू करू
  • लातूर शहरास १ दिवसाआड पाणी देऊ

अशा आशयाचे मजकूर लिहण्यात आले होते. सकाळीच ही सगळी मंडळी एकत्र जमली होती, होळी पेटवताना त्यांनी भाजप सरकारच्या नावे बोंबाही मारल्या. या अंदोलनात सुरज राजे,जफर नाना,अॅड.किशन शिंदे,कुणाल श्रंगारे,कुनाल वागज,ओमकार सोनवणे,जाफर सय्यद, अराफत पटेल, अजय वागदरे,शाहबाज खान, राम गोरड,विशाल चामे, मुरारी पारीख,बालाजी मिटकरी, मनोज रूकमे, अभिजीत साबणे,महेश ढोबळे, महेश गंगथडे,हरीदास मगर, अॅड.वसीम खोरीवाले, सुनील जाधव,जयकुमार ढगे, आकाश जाधव, निलेश वाघमारे इत्‍यादीनी सहभाग घेतला होता

आपली प्रतिक्रिया द्या