आरटी-पीसीआर नसल्याने स्पाईस जेटच्या क्रुला 21 तास विमानातच डांबले

हिंदुस्थानातून येणाऱ्या प्रकाशांविषयीच्या अचानक बदलत्या नियमांचा फटका स्पाईसजेटच्या दिल्ली ते झगरेब फ्लाईटच्या क्रु मेंबर्सना बसला. क्रोशियाच्या झगरेब विमानतळाकर स्पाईसजेटच्या क्रु मेंबर्सकडे कोरोनाचा आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट नसल्याने त्यांना तब्बल 21 तास विमानातच अडकून पडावे लागले. स्पाईस जेटच्या क्रुला बाहेर तर पडू दिले नाहीच, शिवाय कोणत्याही प्रवासी किंवा कार्गे शिवाय 21 तासांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर परतीचे विमान रिकामेच दिल्लीला पाठविण्यात आले. विशेष म्हणजे हे विमान दिल्लीहून झगरेबसाठी उड्डाण घेण्यापूर्वी क्रोशियन प्रशासनातर्फे क्रु मेंबरसाठी आरटी-पीसीआरची काहीही गरज नसल्याचे सांगण्यात आले होते. मंगळवारी झगरेबला विमान पोहचल्यानंतर विमानाचे चार पायलट, तसेच केबिन क्रु मेंबरना नियम बदलल्याचे सांगण्यात आले. हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आम्ही आरटी-पीसीआर टेस्ट बंधनकारक केल्याचे क्रोशिया प्रशासनाने म्हटले आहे. कोरोनाने शनिवारी हिंदूस्थानात 3 लाख 26 हजार 98 प्रकरणांची नोंद झाली आणि 3,890 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या