‘अगस्ती’ साखर कारखाना निवडणूकीत भाजपच्या पिचड यांच्या पॅनलचा दारूण पराभव, समृद्धी मंडळाचा विजय

‘अगस्ती’ साखर कारखान्याच्या निवडणूक निकाल आज जाहीर झाला असून माजी मंत्री, भाजप नेते मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचा दारूण पराभव झाला. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाने शेतकरी विकास मंडळाचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला आहे. शेतकरी विकास मंडळाच्या पराभवाने पिचड यांच्या राजकीय कारकीर्दिला घरघर लागल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आधी विधानसभेतील पराभव आणि आता साखर कारखाना निवडणुकीतील त्यांच्या राजकीय कारकीर्दिला धक्का मानला जात आहे.

आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार त्याआधी वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांना निवडणुकांमध्ये पराभवच अनुभवायला मिळत आहे.

आतापर्यंतचे निकाल

1) आरोटे अशोक झुंबरराव (समृद्धी)
विजयी
4414

2) आरोटे सुधाकर काशिनाथ (विकास)
पराभूत
2711

3) कोटकर सुनिल सुकदेव (विकास)
पराभूत
2392

4) नाईकवाडी परबत नामदेव (समृद्धी)
विजयी
4414

5) शेटे किसन रावजी (विकास)
पराभूत
2528

6) शेटे विकास कचरु (समृद्धी)
विजयी
4138

7) फोडसे संपत कारभारी (अपक्ष)
पराभूत
173