कोंढुर येथे शिवसेनेच्या प्रयत्नाने विकासकामांचा शुभारंभ

कळमनुरी तालुक्यातील सिंदगी जिल्हा परिषद गटामधील कोंढुर गावामध्ये दत्तमंदिराच्या परिसरात जिल्हा परिषदेच्या निधीतून ९ लाख रुपये खर्चुन दत्तमंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या होणाऱ्या कामाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर यांच्या हस्ते करण्यात आला.

सिंदगी जिल्हा परिषद गटाचे सदस्य बाळासाहेब मगर यांनी कोंढुर येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार दत्तमंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडून मंजुर करुन घेतला आहे. या कामाला १९ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. यावेळी बाळासाहेब पतंगे, उत्तमराव पतंगे, रुपेश पतंगे, धोंडबाराव पतंगे, भुजंग भारती, समाधान पतंगे, विठ्ठल पतंगे, सोपानराव पतंगे, पांडुरंग पांचाळ यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलतांना बाळासाहेब मगर म्हणाले की, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सिंदगी सर्वâलमधील गावांमध्ये पोहचविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या