उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

44

सामना प्रतिनिधी। मंडणगड 

सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने जनहितासाठीची शिवसेनेची वाटचाल अव्याहतपणे चालू आहे. या जाणिवेतून जनतेला झटपट आरोग्यसेवा मिळण्यासाठी दापोली आणि मंडणगड तालुक्यांसाठींचा दोन रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे संपन्न झाला.

शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रेरणेने युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी सदस्य योगेश कदम आणि सिद्धेश कदम यांच्याकडून दापोली आणि मंडणगड तालुक्यासाठी सुसज्ज अद्ययावत अशा प्रकारच्या दोन स्वतंत्र रुग्णवाहिका देण्यात आल्या. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे संपन्न झाला. दापोली तालुक्यासाठी माजी उपसभापती उन्मेष राजे यांच्याकडे तर मंडणगड तालुक्यासाठी देण्यात येणाऱया रुग्णवाहिकेच्या चाव्या उद्धव ठाकरे यांनी मंडणगडचे माजी विभागप्रमुख प्रताप घोसाळकर यांच्याकडे सुपुर्द केल्या. यावेळी युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी सदस्य योगेश कदम आणि सिद्धेश कदम, अंधेरी उपविभागप्रमुख सुनील भागडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, भगवान घाडगे, तालुकाप्रमुख संतोष गोवळे, सिद्धेश देशपांडे, शिवसेना मंडगणगड शहरप्रमुख विनोद जाधव, उपशहरप्रमुख नीलेश गोवळे, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर आदी उपस्थित होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या