बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नगररचना सहसंचालकाची आयकर विभागाकडून तपासणी सुरु

540

बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राज्याच्या नगररचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत त्यांच्याकडे 2 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या काही ठिकाणी बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आल्यामुळे एसीबीने त्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे. त्यानुसार आयकर विभागाच्या बेनामी मालमत्ता शाखेकडून याप्रकरणाची समांतार चौकशी सुरु केली आहे.

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझिरकर, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा अशा चौघांवर 17 जूनला अंलकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नाझिरकर कुटूंबिय पुण्यात राहण्यास आहे. तर हनुमंत नाझिरकर यांची अमरावती येथे नियुक्ती आहे. एसीबीने केलेल्या तपासात नाझीरकर यांच्या पुण्यात दोन व सातारा येथे तीन मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्याकडी तीन मोटारी, दोन दुचाकी, सोन्याचांदीचे दागिने असा 1 कोटी 18 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पथकाने केलेल्या तपासात नाझिरकर यांची मोठ्या प्रमाणावर बेनामी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. ही मालमत्ता नातेवाईक, मित्रमंडळींच्या नावाने घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा बेनामी मालमत्तेबाबत तपास करुन कारवाई करण्यासाठी एसीबीने आयकर विभागाला पत्र पाठविले होते. त्यानुसार आयकर विभागाने समांतर तपास सुरु केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या