आयकर अधिकारीच घेत होता लाच, सीबीआयनं पकडला रंगेहाथ

40

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

दोन लाख रुपयांची लाच घेताना एका आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. सीबीआयने ही कारवाई केली असून पुढील चौकशीसाठी या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरातील आयकर अधिकारी एसव्ही कोठावडे यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि कोठावडे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.

आपली प्रतिक्रिया द्या