चिनी मोबाइल कंपन्यांचे धाबे दणाणले, आयकर विभागाच्या धाडी सुरू

देशात कार्यरत असलेल्या चिनी मोबाईल कंपन्यांवर आयकर विभागाकडून कडक कारवाई करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. देशभरातील चिनी मोबाईल कंपन्यांच्या ठिकाणांवर आयकर विभाग छापे टाकत असल्याची माहिती मिळते आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये असलेल्या अनेक चिनी कंपन्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत असल्याचे वृत्त आहे. एनडीटिव्हीने हे वृत्तप्रसिद्ध केले आहे.

आज सकाळी 9 वाजल्यापासून आयकर विभागाची कारवाई सुरू झाली आहे. विभाग दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू येथे छापे टाकत आहे.

दरम्यान, असे वृत्त येत आहेत की या चिनी कंपन्यांवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करचोरी केल्याचा आरोप आहे, ज्यांचा विभाग तपास करत आहे.