अर्थसंकल्पात आयकर रचनेत बदल होण्याची शक्यता

arun-jaitley

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या जनतेला आयकर रचनेत बदल करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. करमर्यादा वाढवण्यासोबतच सामान्य नागरिकांना गृहकर्जात सवलत देण्याबाबत निर्णय घेतले जातील असं सांगण्यात येत आहे.

नोटाबंदीमुळे हातावर पोट असलेला वर्ग आणि  भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यात महत्वाची भूमिका बजावणारा मध्यम तसंच उच्चमध्यमवर्ग प्रचंड त्रासलेला आहे. नोटाबंदीचा त्रास त्याला अजूनही सहन करावा लागतोय. त्यामुळे केंद्र सरकार आयकर रचनेत काही बदल करण्याची शक्यता आहे.
सध्या २.५ ते ५ लाखांपर्यंत १० टक्के, ५-१० लाखांसाठी २० टक्के आणि १० लाखांपेक्षा अधिक मिळकतीवर ३० टक्के आयकर लागतो. यातला पहिल्या स्तराची मर्यादा वाढवली जाईल असं सांगण्यात येत आहे. तसेच पहिल्या स्तरासाठी घेतला जाणारा १० टक्के आयकर कमी केला जाण्याचीही शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या