देशात महागाई वाढत आहे. त्याचप्रमाणे घराच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. दिल्ली आणि मुंबईतील घरे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. कोरोनानंतर रियल इस्टेट क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येत आहे. घराच्या किंमतीत वाढ झाली असली तरीही गृहकर्जाच्या सुविधेमुळे अनेकजण घरे विकत घेत आहे. तर काही शहरांमध्ये घरभाड्यातही वाढ झाल्याने महानगरात राहणे कठीण होत आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये मालमत्तेतून भाड्याचे उत्पन्न वाढले आहे. 2023 मध्ये भाड्यात 30% वाढ झाली होती आणि ही गती 2024 मध्येही कायम राहण्याचा अंदाज आहे. देशात घरभाड्याबाबत बंगळुरू आघाडीवर आहे. इतर शहरांच्या तुलनेत बंगळुरूत भाड्याने घरात राहणे महागडे ठरत आहे. काही शहरात घरभाड्यात तब्बल 40% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
आपले घर विकत घेणे आताच्या काळात खुप कठीण आहे. महानगरात प्रॉपर्टीचे भाव आभाळाला टेकले आहे. आणि गेल्या चार वर्षांत त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, 2020 ते 2024 या काळात देशातील काही प्रमुख शहरांमधील मालमत्तेची किंमत 9.3% मध्ये वाढ झाली आहे, तर घरगुती उत्पन्न 5.4% च्या कमी दराने वाढले आहे.
मॅजिकब्रिक्स ने दिलेल्या अहवालानुसार 2024 मध्ये हे देशातील टॉप 10 प्रॉपर्टी मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त शहरांमध्ये चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता ही शहरे आघाडीवर आहेत. म्हणजेच येथे घर स्वस्तात मिळू नशकते. मात्र, मुंबई महानगर विभाग आणि राजधानी दिल्ली सर्वसमान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
याच कालावधीत मुंबईत ४.१५ टक्के आणि गुरुग्राममध्ये ४.१ टक्के वाढ झाली आहे. हे स्पष्ट आहे की कोरोना महामारीनंतर, विशेषत: आयटी-केंद्रित शहरांमध्ये पुन्हा एकदा मागणी वाढली आहे आणि मालमत्ता भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवले जात आहे. तर मुंबईतील चेंबूर आणि मुलुंडमध्ये भाज्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.