ऑस्ट्रेलियाविरुद्ध काळी पट्टी बांधून उतरला हिंदुस्थानचा संघ, वाचा काय आहे नक्की कारण

24076

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघातील निर्णायक सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा सामना असून दोन्ही संघ 1-1 बरोबरीत आहे, त्यामुळे निर्णायक लढत जिंकून मालिकेवर कब्जा करण्याच्या मनसुब्याने दोन्ही संघ मैदानात उतरले.

#INDvAUS – ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के, मार्नस पाठोपाठ स्टार्क बाद

निर्णयाक लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हीड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच ही जोडी सलामीला मैदानात उतरली. या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने एक बदल केला. वेगवान गोलंदाज रिचर्डसन याच्या जागी जोस हेझलवूड याला खेळवले तर टीम इंडियाने राजकोटमधील विजयी संघ कायम ठेवला. या लढतीत टीम इंडियाचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि निर्धाव षटकांचा बादशहा बापू नाडकर्णी यांच्या सन्मानार्थ विराटसेना काळी पट्टी बांधून मैदानात उतरली.

मुंबईकर पृथ्वीचे दमदार पुनरागमन, न्यूझीलंडमध्ये ठोकलं तुफानी शतक

माजी फिरकीपटू बापू नाडकर्णी यांचे शुक्रवारी निधन झाले. 1964 मध्ये कसोटी लढतीत इंग्लंडविरुद्ध नाडकर्णी यांनी सलग 21 षटकं निर्धाव टाकली होती. नाडकर्णी यांनी 1955 ते 1968 या काळात टीम इंडियाकडून 41 कसोटी लढती खेळल्या. यात त्यांनी 1414 धावा काढल्या आणि 88 बळी घेतले.

बस झालं, आता जीवन संपवावं; संघात जागा न मिळाल्याने प्रसिद्ध क्रिकेटपटू नैराश्यात

आपली प्रतिक्रिया द्या