‘त्यांच्याकडे विराट-रोहित आहेत, आमच्याकडे…’ पराभवानंतर फिंचची भन्नाट प्रतिक्रिया

2012

ऑस्ट्रेलियाचा संघ नुकताच हिंदुस्थान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात खेळल्या गेलेल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या संघाला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. पहिला सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतली होती, मात्र राजकोट आणि बंगळुरुतील सामना जिंकात टीम इंडियाने विजयाची पताका फडकावली. ही मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच याने प्रांजळपणे आपला पराभव मान्य केला आहे.

आयसीसी क्रमवारीत रोहित-विराट सुस्साट; बुमराह, जाडेजाचीही आगेकुच

टीम इंडियाकडे विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू आहेत. एक दिवसीय क्रिकेटमध्ये ग्रेट खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश करता येईल, तर रोहितही पहिल्या पाचात येईल. त्यामुळे तो एक अॅडव्हान्टेज त्यांच्याकडे नक्कीच होता. आमच्याकडेही चांगले खेळाडू आहेत मात्र त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी अधिक प्रभावी मारा केल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला, अशी प्रतिक्रिया फिंचने दिली आहे.

बंगळुरुत झालेला निर्णायक सामना जिंकत टीम इंडियाने मालिका विजय मिळवला. टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 286 धावांवर रोखला. यानंतर सलामीवीर रोहित शर्माच्या शतकी आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 7 विकेट्स राखून विजय मिळवला.

रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम, धोनी-पॉन्टिंगला जे जमलं नाही ते ‘करून दाखवलं’

आपली प्रतिक्रिया द्या