#INDvBAN इंदूरमध्ये विराटसेनेने रचला विक्रमांचा डोंगर, वाचा सविस्तर…

7240

इंदूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने पाहुण्या बांगलादेशवर एक डाव आणि 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने पाच दिवसांची कसोटी तिसऱ्याच दिवशी आपल्या नावावर केली. पहिल्या डावात 243 धावांची खेळी करणारा सलामीवीर मयांक अग्रवाल आणि टीम इंडियाचे गोलंदाज विजयाचे नायक ठरले. या शानदार विजयासह विराटसेनेने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

सलग सहा विजय

virat1
टीम इंडियाने इंदूर कसटी जिंकून सलग सहा कसोटी सामने जिंकण्याच्या आपल्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली. याआधी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली खेळताना टीम इंडियाने 2013 मध्ये सलग 6 विजय मिळवले होते.

डावाने विजयाचा विक्रम

team-india
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक वेळा डावाने कसोटी विजय मिळवला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत 10 कसोटी सामने एक डाव राखून जिंकले आहे. विराटने धोनीचा 9 कसोटी डावाने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. धोनीनंतर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली 8 वेळा आणि सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली 7 वेळा डावाने विजय मिळवला आहे.

एकाच सिझनमध्ये मोठा विजय

shami
इंदूर कसोटीपूर्वी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पुणे कसोटीत एक डाव आणि 137 धावांनी तर रांची कसोटीत एक डाव आणि 202 धावांनी पराभूत केले होते. एकाच सिझनमध्ये मोठ्या अंतराने विजय मिळवण्याची टीम इंडियाची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1992-93 मध्ये इंग्लंडला चेन्नई, मुंबई कसोटीत, तर झिम्बाब्वेला दिल्ली कसोटीत मोठ्या फरकाने पराभूत केले होते. यानंतर 1993-93 ला श्रीलंकेविरोधात 3-0 असे निर्भेळ यश मिळवले होते.

ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी

team
टीम इंडियानी सलग तीन कसोटी सामने एक डाव आणि 100 पेक्षा अधिक धावांनी जिंकले आहे. याआधी असा विक्रम ऑस्ट्रेलियाने 1930-31 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवला होता. या विक्रमाची टीम इंडियाने बरोबरी केली आहे.

12 डावात 2 द्विशतक

mayank
इंदूर कसोटीत मयांक अग्रवालने 243 धावांची द्विशतकीय खेळी केली. मयांकने आतापर्यंत 12 डाव खेळले असून यात 2 द्विशतक झळकावले आहेत. विशेष म्हणजे सर डॉन ब्रॅडमन यांना दोन द्विशतक ठोकण्यासाठी 13 डावांपर्यंत वाट पाहावी लागली होती. यात टीम इंडियाचा माजी खेळाडू विनोद कांबळी आघाडीवर असून त्याने कारकीर्दीच्या सुरुवातीला पाच डावात दोन द्विशतकांची नोंद केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या