न्यूझीलंडला ‘सुपर’ ग्रहण! सात महिन्यांत तीन सुपर ओव्हर, तिन्ही लढतीत पराभव

880

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये रंगलेला तिसरा टी-20 सामना हॅमिल्टनमध्ये रंगला. सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या या लढतीत पुन्हा एकदा न्यूझीलंडचा पराभव झाला. गेल्या सात महिन्यांमध्ये न्यूझीलंडचा संघ तीनदा सुपर ओव्हर खेळला आणि तिन्ही वेळेस या संघाला पराभव सहन करावा लागला. यात इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्डकप फायनलचाही समावेश आहे.

हिंदुस्थानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाल्यानंतर क्रिकेट समालोचक इयान स्मिथ हे एवढे दु:खी झाले की त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यात ज्या तीन सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव झाल्या त्या तिन्ही लढतींवेळी इयान स्मिथ हे समालोचन करत होते. त्यामुळे ते एवढे उद्विग्न झाले की त्यांनी निवृत्तीचा निर्णय घेऊन टाकला. तसेच मी गेल्या काही काळात आयुष्यातील महत्त्वाची वर्षे गमावली आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

ian-smith

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सुपर ओव्हरदरम्यान समालोचन करताना इयान स्मिथ म्हणाले होते की, हा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेल्यास मी निवृत्ती घेईल. मी गेल्या काही काळात आयुष्यातील महत्त्वाचे वर्षे गमावली आहेत. परंतु मला हे आवडत आहे, असेही ते म्हणाले.

तीन सुपर ओव्हर आणि तीन पराभव

14 जुलै, 2019 ला इंग्लंडमध्ये रंगलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लागला. या लढतीत न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला.

त्यानंतर 10 नोव्हेंबर, 2019 ला इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टी-20 सामना झाला. या लढतीतही न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव झाला.

आता 29 जानेवारी, 2020 ला हिंदुस्थानविरुद्ध झालेल्या टी-20 लढतीत सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला.

आपली प्रतिक्रिया द्या