टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना, पाहा संपूर्ण वेळापत्रक

17013

ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंनी एकसाथ न्यूझीलंड दौऱ्यासाठी उड्डाण घेतले. टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.

रोहित शर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी दिसताहेत, तर जयप्रीत बुमराहने शेअर केलेल्या फोटोमध्ये शार्दुल ठाकूर, वाशिंग्टन सुंदर, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे खेळाडू दिसत आहेत.


View this post on Instagram

Ready for New Zealand

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये पाच टी-20 सामने, तीन एक दिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे. न्यूझीलंडमध्ये टी-20 लढती रात्री 8 वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार रात्री साडेबारा) सुरू होतील.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक –

पहिला सामना – 24 जानेवारी (ऑकलँड)
दुसरा सामना – 26 जानेवारी (ऑकलँड)
तिसरा सामना – 29 जानेवारी (हेमिल्टन)
चौथा सामना – 31 जानेवारी (वेलिंग्टन)
पाचवा सामना – 2 फेब्रुवारी (मॉन्गनुई)

टीम 20 मालिकेसाठी हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर.

टीम 20 मालिकेसाठी न्यूजीलंडचा संघ –
केन विलियमसन (कर्णधार), हामिश बेनेट, टॉम ब्रूस, कॉलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गुप्टिल, स्काट के, डेरिल मिशेल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, ब्लेयर टिकनेर, मिशेल सँटनर, टिम सीफर्ट, ईश सोढी, टीम साऊदी.

आपली प्रतिक्रिया द्या