#INDvPAK सचिनचा आणखी एक विक्रम विराटने मोडला

25

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आणखी एक विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या नावावर केला आहे. विराटने एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

विराटने 11 हजार धावांचा टप्पा 222 डावांमध्ये गाठला आहे. सचिनने हा टप्पा गाठण्यासाठी 276 डाव घेतले होते. विराटने तब्बल 54 डाव कमी खेळत हा विक्रम आपल्या नावावर केला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट सध्या नवव्या स्थानी आहे. सौरव गांगुली याचा 11363 धावांचा विक्रम मोडण्याची विराटला चांगली संधी आहे. सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर असून त्याने 49 शतकांसह 18426 धावा चोपल्या आहेत.

सर्वात कमी डावात 11 हजार धावा करणारे खेळाडू –
विराट कोहली (हिंदुस्थान) – 222 डाव
सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान) – 276 धावा
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) – 286 डाव
सौरग गांगुली (हिंदुस्थान) – 288 डाव
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 293 डाव

आपली प्रतिक्रिया द्या