हिंदुस्थान-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आयसीसी करणार विशेष लढतीचे आयोजन

3108

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी वाट पाहात असतात. या दोन संघांचे मैदानावरील द्वंद्व पाहताना प्रेक्षकांचाही उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळे बऱ्याचदा आयसीसीच्या स्पर्धांची आणखी हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने येईल या अनुषंगाने केलेली असते. याला अपवाद पुढील वर्षी 2020 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक होता. परंतु आता आयसीसीने आपला प्लॅन बदलला आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गेल्या बऱ्याच काळापासून फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले आहेत. दोन्ही देश फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये सामने खेळले आहेत. 26/11 ला मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोघांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकातही दोन्ही संघ आमने-सामने येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आयसीसीच्या वतीने पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपआधी एक सामना आयोजित करण्यात येणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये हा सामना होणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तावरून स्पष्ट झाले आहे.

‘वन डे’मध्ये 17 व्या वर्षी झळकावले द्विशतक, हिंदुस्थानच्या खेळाडूचा वर्ल्ड रेकॉर्ड

वृत्तानुसार, आयसीसी टी-20 वर्ल्ड कपआधी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सराव सामना खेळवणार आहे. यापूर्वी आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या वेळापत्रकात दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांमध्ये आहेत. त्यामुळे आयसीसीच्या वतीने चाहत्यांसाठी दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सराव सामना आयोजित करण्यात येणार आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 2012 पासून एकाच ग्रुपमध्ये राहिलेले नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2019 क्रिकेट वर्ल्ड कप रॉबीन राऊंड पध्दतीने खेळले गेले. याआधी 2009 टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सराव सामना झाला होता. दरम्यान, अद्याप यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानमधील सराव सामन्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिलेली नाही.

टी-20 वर्ल्डकपसाठी दोन गट –
ग्रुप 1– पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप A विजेता, ग्रुप B उप-विजेता

ग्रुप 2– हिंदुस्थान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप A उप-विजेता, ग्रुप B विजेता

आपली प्रतिक्रिया द्या