टीम इंडियाचा पुणे कसोटीत डावाने विजय, मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी

4225

पुण्याच्या मराहाष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी लढतीत यजमान टीम इंडियाने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चौथ्या दिवशी आफ्रिकेचा दुसरा डाव टीम इंडियाने अवघ्या 189 धावांमध्ये गुंडाळला.

टीम इंडियाकडून जाडेजा आणि उमेश यादवने प्रत्येकी तीन, आर. अश्विनने दोन, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला. आफ्रिकेकडून एल्गारने सर्वाधिक 48 धावा केल्या, तर बवूमाने 38 आणि फिलँडरने 37 धावांची खेळी केली.

तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांमध्ये संपुष्टात आला होता. त्यावेळी टीम इंडियाकडे 326 धावांची आघाडी होती. टीम इंडियाने आफ्रिकेला फॉलोऑन दिला. चौथ्या दिवशी आफ्रिकेने आपला दुसरा डाव सुरू केला. इशांत शर्माने मार्क्रमला शून्यावर बाद करून आफ्रिकेला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून आफ्रिकेचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही.

#INDvSA पुणे कसोटीमध्ये टीम इंडियाने पाडला विक्रमांचा पाऊस

आफ्रिकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. शंभर धावांच्या आत आफ्रिकेने आघाडीचे पाच फलंदाजा गमावल्याने त्यांचा पराभव निश्चित झाला. सातवा खेळाडू 129 वर बाद झाल्यानंतर फिलँडर आणि महाराजने पहिल्या डावाप्रमाणे दमदार फलंदाजीकरत पराभव काही काळासाठा लांबवला. दोघांमध्ये 50 धावांची भागिदारी झाली. अखेर शमीने ही जोडी फोडली. यानंतर जाडेजाने फिलँडर आणि यादवने रबाडाला बाद करत टीम इंडियाला विजयी केले. टीम इंडियाकडून पहिल्या डावात नाबाद 254 धावा करणाऱ्या विराटला ”सामनावीर” पुरस्कार देण्यात आला.

धावफलक
टीम इंडिया – 601 धावांवर पहिला डाव घोषित
द. आफ्रिका – 275 आणि 189

आपली प्रतिक्रिया द्या