INDvSL टीम इंडियाचे 8 खेळाडू आयसोलेट, नेट बॉलर्सची लागणार लॉटरी

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघातील दुसरा टी-20 सामना आज खेळला जाणार आहे. कृणाल पांड्या पॉझिटिव्ह आल्याने कालचा सामना स्थगित झाला होता. पांड्याच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंनाही आयसोलेट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार शिखर धवन यांना अंतिम-11 खेळाडूंचा संघ निवडणे अवघड झाले आहे. प्रमुख खेळाडूच आयसोलेट झाल्याने नेट बॉलर्सची मात्र लॉटरी लागणार आहे. त्यांना थेट आंतरराष्ट्रीय लढत खेळण्याची संधी मिळणार आहे.

मंगळवारी कृणाल पांड्या याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर सायंकाळी होणारा टी-20 सामना एक दिवस पुढे ढकलण्यात आला. पांड्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणीही करण्यात आली. यानंतर पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, मनिष पांडे, ईशान किशन आणि कृष्णप्पा गौतम या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले.

पडिकलला पदार्पणाची संधी

दरम्यान, एक दिवसीय मालिकेमध्ये पदार्पण करण्याची संधी न मिळालेला तरुण खेळाडू देवदत्त पडिकल याला टी-20 लढत खेळायला मिळण्याची शक्यता आहे. शिखर धवन आणि देवदत्त पडिकल सलामीला, तर ऋतुराज गायकडवाड, संजू सॅमसन, नितिश राणा हे मधल्या फळीत खेळण्याची शक्यता आहे. तसेच दिपक चहर हा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात असेल तर भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे गोलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. तसेच ईशान पोरेल, संदीप वॉरिअर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरनजीत सिंह या नेट बॉलर्सला रेग्यूलर स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला असून यापैकी काहींना थेट आंतरराष्ट्रीय लढत खेळण्याची संधीही मिळू शकते.

पांड्या खेळ सुधार, ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा; गावस्कर यांनी सांगितले अचंबित करणारे नाव

सलग सहावी मालिका जिंकण्याची संधी

दरम्यान, टीम इंडियाकडे श्रीलंकेचा सलग सहाव्या टी-20 मालिकेमध्ये पराभव करण्याची संधी आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 7 द्विपक्षिय टी-20 मालिके खेळल्या गेल्या आहेत. यातील सहा मालिका टीम इंडियाने जिंकल्या आहेत, तर 2009-10 मध्ये झालेली मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. यानंतर झालेल्या पाचही मालिका टीम इंडियाने जिंकल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या