#INDvWI सचिननंतर असा विक्रम करणारा रोहित क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू

17896

विशाखापट्टणमच्या मैदानावर पुन्हा एकदा हिटमॅन रोहित शर्माचे वादळ घोंगावले. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत रोहित शर्मा दणदणीत दीडशतक ठोकले. रोहित शर्माने विंडीजविरुद्ध 138 चेंडूत 159 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 17 चौकार आणि 5 षटकारांची आतिषबाजी केली. या खेळीदरम्यान रोहितने एका अनोख्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

एका कॅलेंडर वर्षामध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीमध्ये रोहित शर्मा संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. विंडीजविरुद्ध विशाखापट्टणमच्या मैदानावर ठोकलेले शतक रोहितचे 2019 मधील सातवे शतक होते. एका कॅलेंडर वर्षामध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने 1998 ला एक दिवसीय क्रिकेटमध्ये 9 शतक ठोकले होते.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतक ठोकणारे खेळाडू –

सचिन तेंडुलकर – 9 (1998)
सौरव गांगुली – 7 (2000)
डेव्हीड वॉर्नर – 7 (2016)
रोहित शर्मा – 7 (2019)

आपली प्रतिक्रिया द्या