#INDvWI दोन्ही कर्णधार ‘गोल्डन डक’, क्रिकेट इतिहासामध्ये विचित्र विक्रमाची नोंद

3495

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजमध्ये विशाखापट्टणम येथील लढतीमध्ये टीम इंडियाने रोहित शर्माचे दीडशतक आणि के.एल. राहुलच्या शतकी, व पंत आणि अय्यरच्या दमदार खेळीच्या बळावर 387 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना विंडीजचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. या दरम्यान एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

#INDvWI सचिननंतर असा विक्रम करणारा रोहित क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू

विंडीजच्या डावाच्या 29 व्या षटकामध्ये शमीने धोकादायक पूरनला बाद केले. बाद होण्यापूर्वी पूरने 47 चेंडूत 75 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर मैदानावर विंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्ड आला. परंतु शमीने पहिल्याच चेंडूवर त्याला बाद केले. एकाच लढतीमध्ये दोन्ही संघांचे कर्णधार पहिल्याच चेंडूवर बाद अर्थात ‘गोल्डन डक’ झाले. याआधी टीम इंडियाच्या फलंदाजीवेळी विराट कोहली देखील पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.

एक दिवसीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे.

#INDvWI रोहितचे खणखणीत दीडशतक, विशाखापट्टणममध्ये विक्रमांचा पाऊस

आपली प्रतिक्रिया द्या