INDvsAUS मी खेळण्यास तयार, चौथ्या कसोटीसाठी सेहवागची BCCI ला ऑफर

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानचे खेळाडू एकामागोमाग एक दुखापतग्रस्त होत आहेत. मोहम्मद शमी, के.एल. राहुल, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, मयांक अग्रवाल, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना दुखापत झाली असून यातील बहुतांश चौथ्या कसोटीला मुकणार आहे. ही कसोटी ब्रिस्बेनमध्ये होणार असून दुखापतीने ग्रासलेल्या टीम इंडियाला माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने एक ऑफर दिली आहे.

‘एवढे खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत, 11 खेळाडू होत नसेल तर मी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी तयार आहे. क्वारंटाईनचे काय ते तुम्ही पाहून घ्या’, असे ट्विट सेहवागने केले आहे. यात त्याने बीसीसीआयला टॅग देखील केले आहे.

बुमराह, विहारी, जडेजा बाहेर

दरम्यान, सिडनी कसोटीमध्ये 3 महत्वाच्या खेळाडूंना दुखपत झाली. विहारीच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला, जडेजाच्या बोटाला दुखापत झाली तर बुमराहला पोटाचा त्रास झाला. यामुळे हे खेळाडू 15 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या ब्रिस्बेन कसोटीला मुकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या