#INDvsNZ बीसीसीआयने ट्वीट केला भावूक फोटो, नेटकऱ्यांचे डोळे पाणावले

11908

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात हॅमिल्टन येथे चौथा टी-20 सामना सुरू आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. पाच सामन्यांच्या मालिकेत 0-3 ने पिछाडीवर असणाऱ्या न्यूझीलंडला या लढतीत कर्णधार केन विलियम्सनशिवाय मैदानात उतरावे लागले. खांद्याला दुखापत झाल्याने विलियम्सन या लढतीला मुकला. या लढतीत टीम साऊदीकडे न्यूझीलंडची कमान देण्यात आली.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 165 धावा करत यजमान संघाला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले. मनिष पांडे याने नाबाद 50 धावा केल्या, तर लोकेश राहुलने 39 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या डावादरम्यान बीसीसीआयने एक असा फोटो शेअर केला की ज्यामुळे नेटकरी आणि क्रीडाप्रेमी भावूक झाले. यात प्रेक्षक एक फोटो घेऊन बसल्याचे दिसत आहे. यावर ‘We miss you dhoni’ असे लिहिलेले आहे.

बीसीसीआयने हा फोटो शेअर केल्यानंतर धोनीला क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आसुसले आहेत. हा फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी याखाली भावूक रिप्लाय दिले आहेत.

दरम्यान, धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकापासून मैदानात पाऊल ठेवलेले नाही. धोनीने कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्ती घेतलेली आहे. 90 कसोटीतील 144 डावात 4876 धावांची नोंद धोनीच्या नावापुढे आहे. तर 350 वन डेमध्ये 10773 धावा धोनीने चोपल्या आहेत. 98 टी-20 लढतीत 1617 धावाही धोनीने केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या