हिंदुस्थानचा संघ टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, वाचा सर्व आकडेवारी

7858

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडच्या दीर्घ दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने या दौऱ्याची सुरुवात धडाकेबाज केली असून पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत पहिले दोन सामने जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ऑकलंडमध्ये झालेल्या पहिल्या लढतीत यजमान संघाचा 6 विकेट्सने तर दुसऱ्या लढतीत 7 विकेट्सने पराभव केला. आता मालिकेतील तिसरा सामना हॅमिल्टनमध्ये रंगणार असून या लढतीत विजय मिळवून टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याची सुवर्णसंधी विराटसेनेकडे आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात 29 जानेवारीला तिसरा टी-20 सामना हॅमिल्टनच्या मैदानावर रंगणार आहे. पहिल्या दोन्ही लढतीत यजमान संघाचा धुव्वा उडवल्यानंतर विराटसेना विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये एकदाही टी-20 मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे हॅमिल्टमधील लढतीत विराटसेना इतिहास रचण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

राहुलचा ऐतिहासिक पराक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक फलंदाज

दोन्ही संघात 2008 मध्ये पहिल्यांदा टी-20 मालिका खेळली गेली होती. यात न्यूझीलंडने 2-0 असा विजय मिळवला होता. 10 वर्षानंतर अर्थात 2018 मध्ये हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात खेळलेल्या गेलेल्या टी-20 मालिकेवरही यजमान संघाने 2-1 असा कब्जा केला. त्यामुळे आता टीम इंडियाकडे न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देण्याची संधी आहे.

#INDvNZ न्यूझीलंडमध्ये विजयाचा ‘तिरंगा’ फडकला, ऑकलंडमध्ये हिंदुस्थानची हॅटट्रीक

दोन्ही संघात आतापर्यंत 14 टी-20 लढती झाल्या असून न्यूझीलंडने 8 वेळा, तर टीम इंडियाने 5 वेळा विजय मिळवला. एक सामना काही कारणास्तव रद्द झाला होता. टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत टी-20 लढती खेळल्या असून यात तीन विजय मिळवले आहेत. टीम इंडियाकडे आपली कामगिरी सुधारण्याची नामी संधी आहे. लोकेश राहुलसह इतर फलंदाज आणि गोलंदाजही चांगलेच फॉर्मात असल्याने हॅमिल्टमध्ये विराटसेना विजयी पताका पडकावण्यासाठी मैदानात उतरेल.

आपली प्रतिक्रिया द्या