फिरकीने गुंडाळले, लंकेचे हिंदुस्थानसमोर २१६ धावांचे आव्हान

8

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या सामन्यात हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी लंकेचा डाव ४५ षटकात २१५ धावांत संपुष्टात आला. मालिका विजयासाठी हिंदुस्थानसमोर २१६ धावांचे आव्हान आहे. लंकेकडून उपूल थरंगाने सर्वाधिक ९५ धावा केल्या.

…तर पांड्याच्या नावावर जमा झाला असता ‘नकोसा’ विक्रम

नाणेफेक जिंकत हिंदुस्थानने लंकेला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. लंकेची सुरुवात चांगली झाली नाही. बुमराहने गुणतिलकाला १२ धावांवर बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. फक्त १५ धावांवर पहिला गडी बाद झाल्याने दबावात आलेल्या लंकेचा डाव थरंगा आणि समरविक्रमाने सांभाळला. दोघांमध्ये १०० पेक्षा जास्त धावांचा भागिदारी झाली. यादरम्यान अर्धशतकाकडे वाटचाल करणाऱ्या समरविक्रमाला चहलने ४२ धावांवर बाद केले. त्यानंतर मोहाली सामन्यातील शतकवीर मॅथ्यूजही १७ धावा काढून चहलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला.

आजच्या सामन्यात धोनी १० हजार धावांचा टप्पा गाठू शकेल?

समोरील फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना थरंगाने एका बाजूने दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले. थरंगाने पांड्याच्या एकाच षटकात सगल ५ चौकार ठोकत जोरदार फलंदाजी केली. मात्र शतकापासून ५ धावा दूर असताना तो बाद झाला. कुलदिप यादवने त्याला धोनीकरवी झेलबाद केले. एकवेळ लंकेची स्थिती २ बाद १६० अशी होती. मात्र थरंगा बाद झाल्यानंतर लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. हिंदुस्थानकडून युजवेंद्र चहल आणि कुलदिप यादवने प्रत्येकी ३ बळी घेतले, तर हार्दिक पांड्याने २ आणि बुमराह व भुवीने प्रत्येकी एक बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या