टी-20 मध्येही हार्दिक पांड्याची निराशाजनक कामगिरी; नेटकऱ्यांनी ट्रोल करत शेअर केले मिम्स

हिंदुस्थान आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या टी-20 सामन्यातही हार्दिक पांड्या चमक दाखवू शकला नाही. एकदिवसीय सामन्याप्रमाणेच टी-20 मध्येही त्याने निराजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करत त्याच्यावर मजेशीर मिम्स शेअर केले आहेत. एकदिवसीय सामन्यातही खराब कामगिरीनंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा टी-20 सामन्यानंतरही तो ट्रोल होत आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्यात क्रिकेटरसिकांना अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्याने क्रिकेच रसिकांची निराश केली आहे. प्रथम फलंदाजीसाठी करणाऱ्या टीम इंडियाने फक्त 164 धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे हिंदुस्थानची फलंदाजी संपल्यावर ट्विटरवर अनेकांना पांड्यावर टीका केली. एकदिवसीय सामन्यतही पांड्याने चमक दाखवली नव्हती. त्यामुळे टी-20 सामन्यासाठी त्याच्याकडून अपेक्षआ होत्या. मात्र, त्या फोल ठरल्या आहेत.

सूर्यकुमार यादवनंतर फलंदाजीसाठी आलेल्या पांड्याने 12 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याने चमक दाखवली नाही. तसेच क्षेत्ररक्षण करताना त्याने एक झेलही सोडला. त्यामुळे पांड्या ट्रोल होत आहे. काहीजणांना पांड्याऐवजी दुसऱ्या खोळाडूला संघात संधी द्यावी, असे मतही व्यक्त केले आहे. त्याच्या सुमार कामगिरीमुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांनी मजेशीर मिम्स शेअर करत त्याला ट्रोल केले आहे. त्यात त्याने सोडलेला झेल, सुमार फलंदाजी यावर मजेशीर मिम्स बनवण्यात आले आहेत. तसेच तू अष्टपैलू खेळाडू आहेस ना, असा सवालही नेटकऱ्यांनी त्याला केला आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या