…म्हणून तिसरे पंच मैदानावर उतरले

43

सामना ऑनलाईन । कोलकाता

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघामध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पहिली कसोटी सुरू आहे. सामन्याचे पहिले दोन दिवस पावसामुळे खेळ वाया गेले, मात्र तिसऱ्या दिवसाचा खेळ वेळेत सुरू झाला. यादरम्यान फिल्ड अंपायर रिचर्ड केटलबोरो मैदानात उतरले नाहीत. त्यांच्याऐवजी तिसरे पंच जोएल विल्सन आणि दुसरे पंच नायजेल लांग मैदानावर उतरले. त्यानंतर खेळ सुरू झाला.

बंगाल क्रिकेट संघाचे अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना असे सांगितले की, केटलबोरो यांच्या घशाला इंफेक्शन झाल्याने ते मैदानात उतरले नाहीत. त्याऐवजी वेस्ट इंडिजच्या विल्सन यांनी पंच म्हणून कमान सांभाळली आहे. चौथे पंच अनिल चौधरी यांना टीव्ही अंपायर करण्यात आले आहे, तर बंगाल क्रिकेट संघाचे विनोद ठाकूर यांना पंचांच्या बोर्डमध्ये सहभागी करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या