हिंदुस्थानी महिलांचा विजयी चौकार, चुरशीच्या लढतीत विंडीजवर मात

500

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाने टी 20 मालिकेत यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध सोमवारी विजयाचा चौकार लगावला. पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 9 षटकांच्या झालेल्या या लढतीत हिंदुस्थानने 7 बाद 50 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल विंडीजला 5 बाद 45 धावांपर्यंतच मजल मारता आली अन् हिंदुस्थानने 5 धावांनी बाजी मारली. याचबरोबर हिंदुस्थानी महिलांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने हाणामारीच्या नादात 9 षटकांत 50 धावा जमविताना 7 फलंदाज गमावले. पूजा वस्त्रवारने यात सर्वाधिक 10 धावाची खेळी केली. मिळालेल्या 51 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांचाही गोंधळ उडाला. अखेरच्या षटकात विंडीजला विजयासाठी 13 धावा हव्या होत्या. मात्र, मोक्याच्या वेळी दुसऱ्या व पाचव्या चेंडूवर अनुजा पाटीलने बळी घेतल्याने विंडीजच्या विजयाची पाटी कोरीच राहिली.

आपली प्रतिक्रिया द्या