बच्चू कडू अपघातात जखमी, रस्ता ओलांडताना बाईकने धडक दिली

अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू हे अपघातात जखमी झाले आहे. रस्ता ओलांडत असताना एका बाईकस्वाराने त्यांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याचे कळते आहे. अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात बच्चू कडू यांना दाखल करण्यात आले आहे.

बाईकस्वाराने दिलेल्या धडकेत आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला जखमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या डोक्याला झालेल्या जखमेमुळे चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला होता. बाईकस्वाराने धडक दिल्यानंतर बच्चू कडू हे डिव्हायडरवर आपटले होते.