देशात 29.2 टक्के पुरुषांना, तर 1.2 टक्के महिलांना दारुचे व्यसन

देशात 29.2 टक्के पुरुषांना, तर केवळ 1.2 टक्के महिलांना दारूचे व्यसन लागले आहे. इतर राज्यांत दारुच्या आहारी गेलेल्या महिलांची संख्या कमी आहे. मात्र आसाममध्ये दारु पिण्यात महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. आसाममध्ये 44.8 टक्के महिला दर आठवडय़ातून एकदा दारु पितात, तर मद्यपी पुरूषांची संख्या अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 59 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य व पुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.

2019-20 या वर्षातील मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये 15 ते 49 वर्षे वयोगटातील 26.3 टक्के महिला दारू पितात. यापाठोपाठ जम्मू-कश्मीरात 23 टक्के महिला दारुच्या आहारी गेल्या आहेत. चंदीगढ, लक्षद्वीपमध्ये एकाही महिलेला दारूचे व्यसन लागलेले नाही. तसेच उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दारु पिणाऱया महिलांचे प्रमाण 10 टक्क्यांच्या खाली आहे. राष्ट्रीय पातळीवर दर आठवडय़ात एकदा दारु पिणाऱया महिलांचे सरासरी प्रमाण 35 टक्के, तर पुरुषांचे प्रमाण 40.7 टक्के आहे.

तंबाखू सेवनाचे प्रमाण पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक

पश्चिम बंगालमध्ये तंबाखूचे सेवन करणाऱया पुरुषांप्रमाणेच महिलांचीही संख्या सर्वाधिक आहे. 80.4 टक्के पुरुष, तर 59.2 टक्के महिला हातात सतत तंबाखू मळतात. त्यापाठोपाठ तेलंगणामध्ये 70 टक्के पुरुष आणि 48.8 महिला तंबाखूचे सेवन करतात. तसेच उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि बिहारमध्ये 60 टक्क्यांहून अधिक पुरुष तंबाखूचे सेवन करतात, असे आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या