अमेरिका हिंदुस्थानच्या कर्जाखाली, ‘इतक्या’ कोटींचे आहे देणे बाकी..

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका हा हिंदुस्थानचा कर्जदार आहे. अमेरिकेवर मागील दोन दशकात कर्जाचा बोजा झपाट्याने वाढला आहे. हिंदुस्थानचे अमेरिकेवर 216 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. अमेरिकेवर एकूण 29 हजार अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 15 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.

चीन आणि जपान यांचे अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे. 2020 मध्ये अमेरिकेचा एकूण राष्ट्रीय कर्ज 23400 अब्ज डॉलर्स इतके होते. याचा अर्थ प्रत्येक अमेरिकन नागरिकावर सरासरी 72309 डॉलर्सचे कर्ज आहे.

चीन आणि जपानचे सर्वाधिक कर्ज

अमेरिकेचे खासदार अ‍ॅलेक्स मूनी यांनी सांगितले की, ‘आपले कर्ज 29000 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा बोजा जास्त प्रमाणात वाढत आहे. चीन आणि जपान यांचे सर्वाधिक कर्ज अमेरिकेवर असून ते आपले मित्र नाही. अमेरिकेवर चीनचे 1000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.

अ‍ॅलेक्स मूनी म्हणाले, ‘जे देश आपल्याला कर्ज देत आहेत, त्याची परतफेड ही करायची आहे. हे देश आपल्या हित्यांची काळजी घेतीलच, हे गरजेचं नाही. तसेच हे देश मनापासून आपल्यासोबत आहे की नाही. हे आपण सांगू शकत नाही.’ ते म्हणाले, ‘ब्राझीलचे आपल्याला 258 अब्ज डॉलर्स देणं आहे. तसेच हिंदुस्थानचेही आपल्यावर 216 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या